Budget Session Live Update: केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी अण्णा हजारेंच्या भेटीला

Budget Session Live Update: केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी अण्णा हजारेंच्या भेटीला
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी अण्णा हजारेंच्या भेटीला
१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू
२६ जानेवारीला तिरंग्याचा झालेला अपमान ही दुर्देवी घटना – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेला हिंसाचार दुर्भाग्यपूर्ण – राष्ट्रपती
छोट्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तीन महत्त्वाची विधेयके मंजूर केली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
सरकार प्रत्येक आंदोलनाचा समान करते – राष्ट्रपती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना श्रद्धांजली दिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद अभिभाषणासाठी संसदेत दाखल झाले आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद अभिभाषणासाठी रवाना झाले आहेत. दोन टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. पण अधिवेशनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले आहेत. माध्यमांशी त्यांनी बातचित करताना म्हटले की, आज यावर्षातले पहिले सत्र सुरू होत आहे. गेल्या वर्षी सरकार अनेक वेळा मिनी बजेट मांडले आणि हे नवे बजेट याच श्रृंखलेनुसार पाहायला मिळेल.
महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील उपस्थिती असेल.
देशात गेल्या २४ तासांत १८ हजार ८५५ नवे रुग्ण आढळले असून १६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात २० हजार ७४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ७ लाख २० हजार ४८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५४ हजार १० जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ३ लाख ९४ हजार ३५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जगातील कोरोनाबाधितांची संख्या १० कोटी २० लाख पार झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १० कोटी २० लाख ५ हजार पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत २१ लाख ९९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ७ कोटी ३८ लाख ४१ हजारांहून अधिक कोरोनामुक्त झाले आहे.
First Published on: January 29, 2021 3:26 PM
Exit mobile version