लैंगिक शोषणाच्या आरोपींना मृत्यूदंड

लैंगिक शोषणाच्या आरोपींना मृत्यूदंड

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पॉस्को कायद्यात मोठा बदल करण्यात आला आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषणा करणाऱ्या आरोपींना आता मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून मृत्यूदंडाच्या शिक्षेला परनावगी दिली आहे. पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे.

पॉस्को कायद्यात बदल

१२ वर्षांखाली लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पॉस्को कायद्यात बदल केले असून यापुढे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.


वाचा – ‘बलात्काराच्या प्रत्येक गुन्ह्यात अल्पवयीनला फाशी अशक्य!’


 

First Published on: December 28, 2018 5:19 PM
Exit mobile version