सुंदरीला पाहण्यासाठी मोडले कायदे

सुंदरीला पाहण्यासाठी मोडले कायदे

एड्रिन कोलेझर (फोटो सौजन्य : Instagram)

प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी धडपड करत असते. आपण सुंदर दिसावे याकरता वेगवेगळे प्रयत्न देखील करत असतात. तर काही व्यक्ती इतक्या सुंदर असतात की, त्यांच्याकडे पाहतच बसावे अस वाटत असतं. अशाच एका तरुणीला पाहण्यासाठी लोक कायदा तोड असल्याचे समोर आले आहे. ही घटना आहे जर्मनीमधील. जर्मनीमधील एका सुंदर वाहतूक पोलीस महिलेला पाहण्यासाठी लोक कायदा मोडत असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकारामुळे ही महिला अधिकच त्रस्त झाली आहे. या महिलेचे सोशल माध्यमांवर फोटो देखील चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हिची सुंदरता भूरळ घालणारी

जर्मनीच्या वाहतूक पोलीस दलामध्ये एक सुंदर तरुणी कार्यरत आहे. एड्रिन कोलेझर असे या तरुणीचे नाव असून तिची सुंदरता सगण्यांना भूरळ घालते. या तरुणीचे सोशल माध्यामांवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर तिच्या छात्राचित्रांना मोठ्या प्रमाणात पसंद देखील केले जात आहे. इतकेच नाही तर लोक तिला पाहण्यासाठी तिच्या जवळ जातात आणि कायद्याचे उल्लंघन देखील करतात. एड्रिन रोज आपल्या व्यायामाचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील खूप जास्त आहे. दोन वर्षापूर्वी याच कारणामुळे ती चर्चेत देखील आली होती. पण त्यादरम्यान आपल्याला काही अडचणी नसल्याचे तिने वरिष्ठांना सांगितले होते. पण आता तिला आपल्या सुंदरतेची डोके दुखी ठरली आहे.

मॉडेल किंवा पोलीस कर्मचारी म्हणून काम करा

एड्रिन कोलेझर या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी अनेक लोक जाणूनमुजून कायदा तोडतात. यासाठी या तरुणीला सहा महिने बिन पगारी सुट्टीवर देखील पाठविण्यात आले होते. मात्र तरी देखील या तरुणीचे चाहते कमी झाले नाही. तसेच तू मॉडेल ऐवजी पुन्हा पोलीस कर्मचारी म्हणून रुजू व्हावे या उद्देशाने तिला सुट्टीवर पाठवले. मात्र तरी देखील तिची लोकप्रियता घटली नाही. आता तर सॅक्सोनी राज्याच्या पोलीस विभागाने ३४ वर्षीय एड्रिनला नोटीस पाठवली आहे. एक तर पोलीस कर्मचारी म्हणून काम करा किंवा मॉडेल सारखे माध्यमांवर फोटो टाका अशी तंबी देखील तिला देण्यात आली आहे.

First Published on: December 10, 2018 10:11 AM
Exit mobile version