‘या’ देशात कोरोनाचं औषध म्हणून प्यायले विषारी मद्य; ६०० मृत्यू, ३००० आजारी

‘या’ देशात कोरोनाचं औषध म्हणून प्यायले विषारी मद्य; ६०० मृत्यू, ३००० आजारी

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप लस आलेली नाही. इराणमध्ये कोरोनाने कहर केला आहे. इराणमध्ये कोरोनाचे ६२ हजार ५८९ रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या आतापर्यंत ३ हजार ८७२ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाची लस विकसित झाली नसलं तरी इराणमध्ये कोरोनाचं औषध म्हणून विषारी मद्य प्यायले. यामुळे ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर मद्यपान करून आजारी पडल्यानंतर ३००० लोकांना रुग्णालयात दाखल केले गेलं आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, मंगळवारी इराणचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माइली म्हणाले की लोक नीट अल्कोहोल कोरोना विषाणूचं औषध म्हणून पित होते. यानंतर, मोठ्या संख्येने लोक आजारी पडले. इस्माइली म्हणाले की, विषारी मद्यपान केल्यामुळे मृत्यूची संख्या खूप मोठी आहे. तस्निम न्यूज एजन्सीशी बोलताना ते म्हणाले की या प्रकरणात बर्‍याच लोकांना अटकही करण्यात आली आहे. अटक झालेल्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल.


हेही वाचा – पीपीई म्हणजे काय? कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना का महत्वाचे आहे?

इराणमध्ये ६२ हजाराहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. परंतु इराणने कोरोना विषाणूबद्दल जाहीर केलेल्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकार मृतांची संख्या कमी दाखवत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, इराणच्या संसदेच्या किमान ३१ सदस्यांनाही कोरोना विषाणूचा लागण झाली आहे.

 

First Published on: April 8, 2020 2:09 PM
Exit mobile version