पेट्रोल, डिझेल दर : वाढता वाढता वाढे…

पेट्रोल, डिझेल दर : वाढता वाढता वाढे…

आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर उसळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरात पेट्रोल – डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ही वाढ शुक्रवारी (१८ जानेवारी) देखील कायम आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ०.०८ पैशांनी वाढले असून, आजचा पेट्रोलचा भाव ७०.५५ रुपये प्रतिलिटवर पोहचला आहे. तर डिझेलच्या दरात ०.१९ पैशांनी वाढ झाली असून, दिल्लीतील आजचा डिझेलचा दर ६४.९७ रुपये प्रतिलिटर इतका आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येही इंधन दरवाढ कायम आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल ०.०७ पैशांनी वाढले असून, आजचा दर ७६.१८ रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर, डिझेलचा दर ०.२० पैशांनी वाढला असून आज मुंबईत डिझेल ६८.०२ रुपये प्रतिलिटरने उपलब्ध आहे. दरम्यान, सातत्याने सुरु असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत.

 


आंतरारष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. तसंच इंधन दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवर होत असल्यामुळे गरजेच्या काही वस्तूंचे भावही वधारत आहेत. त्यामुळे देशातील समान्य जनता चांगलीच हैराण झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने सुरु असलेलं इंधन दरवाढीचं हे सत्र, पुढे किती काळ सुरु राहणार हे येणारी वेळच सांगेल.

First Published on: January 18, 2019 10:48 AM
Exit mobile version