पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र २८ व्या दिवशी सुरुच

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र २८ व्या दिवशी सुरुच

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये गेल्या २८ दिवसापासून वाढ सुरुच आहे. एक महिना होत आला तरी देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायचे नाव घेत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर उसंडी मारत चालले आहेत. याचा सर्व सामान्य जनतेला सर्वात जास्त फटका बसत आहे. यंदाचा गणेशोत्सव देखील या दरवाढीतच गेला आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने होणाऱ्या या दरवाढीने राज्यात नव्वदचा आकडा अखेर पार केला आहे.. आज पुन्हा ही दरवाढ झाल्यामुळे मुंबईत पेट्रोलमध्ये ११ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ९०.०८ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. तर डिझेलच्या दरात ५ पैशांनी वाढ झाल्याने डिझेल ७८.५८ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. महिना होत आला ही दरवाढ सुरु आहे यावर सरकार काहीच करत नसल्याने जनता नाराज झाली आहे.

राजधानीतही पेट्रोल-डिझेलच्या दर वाढले

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा पार केला तर दिल्लीत ही तिच परिस्थिती पहायला मिळत आहे. दर वाढीचे सत्र असेच चालत राहिले आहे. राजधानीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये ११ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८२.७२ रुपये प्रतीलिटर तर डिझेलच्या दरामध्ये ५ पैशांनी वाढ झाल्यामुळे पेट्रोल ७४.०२ रुपये प्रतीलिटर दराने मिळत आहे. इंधनाच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. या दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या खिशाला आणखी फटका बसत आहे.

राज्यात पेट्रोलची नव्वदी पार

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. तर मुंबई, पुण्यासह ३४ जिल्ह्यामध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्या आहेत तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरत चालल्याने तसेच अमेरिकेचे इराणशी संबंध बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तेलाच्या किंमतींवर होत आहे.

First Published on: September 24, 2018 11:45 AM
Exit mobile version