कर्नाटक निवडणूक झाली आणि पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढल्या

कर्नाटक निवडणूक झाली आणि पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढल्या

Petrol Diesal Price: आजही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १७ आणि २१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कायम असल्याने सर्वसामान्यांसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. कर्नाटक निवडणुकीमुळे इंधनाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी चर्चा होती. मतदान पार पडल्यानंतर लगेचच इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे ही चर्चा खरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी याआधीच म्हटले होते की त्यांच्या कंपनीने तात्पूरता या किमतीचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल आणि डिझेलचा भाव हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. देशात दर दिवसा पेट्रोलचे भाव कमी-जास्त होत असतात. परंतु, सध्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या भाववाढीचा आलेख वाढत चालला आहे. २४ एप्रिलपासून ते १३ मे या १९ दिवसांत निवडणूकच्या पार्श्वभूमीचा विचार करुण इंधनाचे भाव वाढविण्यात आले नव्हते. परंतु, अखेर निवडणूक संपल्यावरती पेट्रोल- डिझेलच्या या भाववाढीने सोमवारी डोकं वर काढले आहे. 14 मे रोजी डिझेलची किंमत दिल्लीत सर्वीधिक अशी प्रतिलिटर 66.14 रु. वर पोहोचली आहे. सोमवारी पेट्रोलचा भाव रु. 74.80 प्रतिलीटरवरती पोहोचले आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ८२.६८ रु. वरती पोहोचले आहेत.

सोमवारी दिल्लीत डिझेलची किंमत प्रतिलिटर 66.14 रु. वर पोहोचली. तर पेट्रोलचे दर रु. 74.80 प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. यापुर्वीही १४ सप्टेंबर २०१३ रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक असे ७६.०६ रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्याचबरोबर सोमवारी मुंबईतही पेट्रोलचे दर प्रतिलिटर रु. ८२.६८ पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मुंबईतही सर्वसामन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर चिंता व्यक्त केली जात आहे. २४ एप्रिलच्या मुंबईत पेट्रोल १७ पैसे तर डिझेल २३ पैशांनी महाग झाले आहे.

First Published on: May 14, 2018 9:31 AM
Exit mobile version