दरवाढ काही थांबेना; पेट्रोलचे दर पुन्हा महागले

दरवाढ काही थांबेना; पेट्रोलचे दर पुन्हा महागले

पेट्रोलचे दर पुन्हा महागले

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सततच्या दरवाढीमध्ये सलग पाचव्या दिवशी पेट्रोलचे दर वाढले आहे. तर डिझेलचे दर घसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीमध्ये सलग पाचव्या दिवशी पेट्रोल ३७ पैशांने वाढले आहे. तर डिझेल ४६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

पेट्रोल – डिझेल दर

दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे प्रति लीटर ७ पैशांनी पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. तर डिझेलचे दर १५ पैशांनी कमी झाले आहेत. दिल्ली आणि कोलकाता येथे डिझेलचे दर कमी झाले आहेत. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये प्रति लीटर १६ पैशांनी कमी झाले आहे.

इंडियन ऑयलच्या माहितीनुसार, दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई मध्ये पेट्रोलच्या दरात क्रमश: ७२.७८ रुपये, ७४.८६ रुपये, ७८.४० रुपये आणि ७५.५९ रुपये वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात क्रमश: ६६.९१ रुपये, ७०.०९ आणि ७०.७१ रुपये प्रति लीटर घट झाली आहे.

का झाले इंधन स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दर स्वस्त केले आहे. गेल्या ५ दिवसात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे इंधानाचे दर घसरल्यांचे सांगण्यात येत आहे.

First Published on: March 18, 2019 5:21 PM
Exit mobile version