Petrol Price Today: सर्वसामान्यांना झटका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Petrol Price Today: सर्वसामान्यांना झटका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या, आजचे दर

सलग दुसऱ्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) किंमतीत आजही वाढ केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोलचे दर (Petrol Price Today) २४ ते २८ पैसे प्रति लीटर आणि डिझेलचे दर (Diesel Price Today) २६ ते २८ पैसे प्रति लीटरने महागले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये १ लीटर पेट्रोलची किंमत ९५.३१ रुपये आणि डिझेल ८६.२२ रुपये झाली आहे.

तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्यांपासून इंधनाच्या किंमतीत वाढत आहेत. गेल्या २१ दिवसांत पेट्रोल ४.९९ पैसे प्रति लीटरने महाग झाले आहे. तर डिझेलची किंमत ५.४४ रुपये प्रति लीटरने वाढली आहे.

आजची पेट्रोलची किंमती जाणून घ्या

दिल्ली – ९५.३१ रुपये प्रति लीटर
मुंबई – १०१.५२ रुपये प्रति लीटर
कोलकाता – ९५.२८ रुपये प्रति लीटर
चेन्नई – ९६.७१ रुपये प्रति लीटर
जयपूर – १०१.८८ रुपये प्रति लीटर
बंगळुरू – ९८.४९ रुपये प्रति लीटर
नोएडा – ९२.६७ रुपये प्रति लीटर

आजची डिझेलची किंमत जाणून घ्या

दिल्ली – ८६.२२ रुपये प्रति लीटर
मुंबई – ९३.५८ रुपये प्रति लीटर
कोलकाता – ८९.०७ रुपये प्रति लीटर
चेन्नई – ८९.०७ रुपये प्रति लीटर
जयपूर – ९५.८१ रुपये प्रति लीटर
बंगळुरू – ९१.४१ रुपये प्रति लीटर
नोएडा – ८६.७० रुपये प्रति लीटर

माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज सकाळी ६ वाजता बदलते. त्यानंतर नवीन किंमत लागू होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर दरात दुप्पट वाढ होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत याच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

First Published on: June 7, 2021 11:16 AM
Exit mobile version