Philippine Plane Crash : फिलिपिन्समध्ये विमानाचा भीषण अपघात, अपघातात २९ जणांचा मृत्यू, तर ५० जण बचावले

Philippine Plane Crash : फिलिपिन्समध्ये विमानाचा भीषण अपघात, अपघातात २९ जणांचा मृत्यू, तर ५० जण बचावले

Philippine Plane Crash : फिलिपिन्समध्ये विमानाचा भीषण अपघात, अपघातात १७ जणांचा मृत्यू, तर ४० जण बचावले

फिलिपिन्समध्ये लष्करी विमान सी-१३० आग लागल्याने कोसळले. या दुर्घटनेत २९ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जवानांना वाचवण्यात यश आले आहे. या विमानात एकूण ९२ जवान होते. या विमानाने कागायन डी ओरो सिटीमधून उड्डाण घेतले होते. सुलुतील जोलो बेटावर या विमानाचे लँडिग करताना हा अपघात घडला. अजूनही काही जवान विमानाच्या ढिगार्‍याखाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातून जवानांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. वाचवण्यात आलेले जवान गंभीररित्या जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

सी- १३० हे लष्कराचे विमान सुलू प्रांतातील जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी विमानाचा भीषण अपघात होत विमानाला आग लागली. या विमान अपघातातून आत्तापर्यंत ४० जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. अशी माहिती लष्कर प्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी दिली.मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती लष्करप्रमुख सिरिलिटो सोबेजाना यांनी दिली.

फिलिपिन्स लष्कराचे हे विमान कागायन डी ओरो शहरातील सैन्याला घेऊन जात होते. परंतु धावपट्टी चुकल्याने या विमानाचे जोलो बेटावर लॅंडिंग करण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानाने पेट घेतला. असे लष्कर प्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना म्हणाले.

First Published on: July 4, 2021 1:33 PM
Exit mobile version