वृद्ध दाम्पत्याचे प्रेम पाहून नेटकरी झाले भावूक; फोटो व्हायरल

वृद्ध दाम्पत्याचे प्रेम पाहून नेटकरी झाले भावूक; फोटो व्हायरल

पश्चिम बंगालमध्ये ४ ऑक्टोबरपासून ८ ऑक्टोबर दरम्यान दुर्गापूजेचा उत्साह मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. याच दिवसातला एक वृद्ध दाम्पत्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या दाम्पत्यांचा फोटो एका युजरने शेअर केला आहे. तेथील दुर्गापूजेच्या वेळी बांधण्यात आलेल्या मंडळात हातात-हात घालून फिरताना दिसत आहेत. तसेच ते सेल्फी काढताना देखील दिसताय.

आतापर्यंत सोशल मीडियावर या व्हायरल होणाऱ्या फोटोला साधारण ४ हजारहून अधिक लाईक मिळाले असून या फोटोला ५ हजार पेक्षा अधिकांनी शेअर केले आहे. या गोंडस फोटोला बघून नेटकऱ्यांनी खूपसाऱ्या कमेंट देखील केल्या आहेत. सोशल मीडियावर डान्स, गाण्याचे तसेत विनोदी व्हिडिओ अधिकाधिक शेअर केले जाते मात्र असे असताना या वृद्ध दाम्पत्याचे प्रेम पाहून नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलेच व्हायरल केले आहे.

सेल्फी काढतांना दिसले हे वयोवृद्ध युगुल

धावपळीचे जीवन जगताना लोकांना आपल्या माणसांना आपल्या माणसांना वेळ द्यायला, त्याची भेट घ्यायला देखील जमत नाही, अशा स्थितीमध्ये या जोडप्यामधील वयाच्या आयुष्याच्या या टप्प्यावर इतके प्रेम पाहिल्यानंतर नेटकरी भावूक झाले.

वयोवृद्ध जोडप्याच्या फोटोला मिळतेय पसंती

या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांना आधार देत हातात हात घालून फिरताना दिसताय तर दूसऱ्या फोटोमध्ये सेल्फी काढताना दिसताय. हा सेल्फी काढताना त्यांच्या सोबत कोणी इतर नसल्याचे समजतेय. दरम्यान हे दाम्पत्य फोटो काढत असताना एका माणसाने फोटो काढून तो फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोला अनेकांची पसंती मिळत आहे.


 

First Published on: October 14, 2019 4:43 PM
Exit mobile version