जेट एअरवेजचे कर्मचारी एक एप्रिलपासून संपावर

जेट एअरवेजचे कर्मचारी एक एप्रिलपासून संपावर

प्रातिनिधिक फोटो

आधीच बॅंकांच्या कर्जांमुळे अडचणीत सापडलेल्या जेच एअरवेज कंपनीच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ होणार आहे. कारण कंपनीच्या एक हजार वैमानिकांनी १ एप्रिलपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यातच ‘नैशनल ऐविएटर्स गिल्ड’ या पायलट युनीयनने थकीत वेतन आणि पुनर्जिवित योजने विषयी ३१ मार्चपूर्वी निर्णय न दिल्यास वैमानिक विमानांचे उड्डाण करणार नाही असा इशारी दिला होता. कंपनीने बॅंकांकडून मागीतलेले कर्ज न मिळाल्याने पायलटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघनेने हा निर्णय घेतला.

२६ बॅंकांचे कर्ज

जेट एअरवेज कंपनीवर २६ बॅंकांचे ८ कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. मागील अनेक महिन्यांपासून कंपनीने या वैमानिकांना वेतन दिलेले नाही. त्यामुळेच या वैमानिकांनी १ एप्रिलापासून विमाने न उडवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांना २५ टक्के वेतन कमी घेण्यास सांगितले, यानंतर जेटएअरवेज च्या खरेदीसाठी टाटा समुहा सोबतची बोलणी देखील फिसकटली. त्यानंतर एकावर एक संकटांमुळे जेट च्या अनेक वैमानिकांनी काम सोडले. त्यामुळे आधिच अडचणीत असलेल्या जेटच्या अडचणीत वौमानिकांच्या संपाची टांगती तलवार आहे.

चेअरमनचा राजीनामा

कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्या नंतर त्यांची कंपनीतील भागीदारी देखील आर्धी झाली आहे. या आधी कंपनीमधील त्यांची भागीदारी ५१ टक्के होती. आता त्यांचा हिस्सा २५.५ टक्के असून कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना ११.४ चार करोड शेअर विकावे लागले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नेरेंद्र मोदींना पत्र लिहुन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच लवकरच जेट एअरवेजचे कर्मचारी कंपनी विरोधात न्यायालयीन याचिका दाखल करण्याच्या विचारात आहेत.

 

 

First Published on: March 30, 2019 3:30 PM
Exit mobile version