जाणून घ्या, पितृपक्षाची सुरूवात कशी झाली? महाभारतात दडलंय श्राद्धाचे पौराणिक रहस्य

जाणून घ्या, पितृपक्षाची सुरूवात कशी झाली? महाभारतात दडलंय श्राद्धाचे पौराणिक रहस्य

श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवणाचा घास देऊन त्यांना प्रसन्न करणे. सनातन मान्यतेनुसार, ज्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्यांना एका विशिष्ट दिवशी जेवण दिले जाते त्याला श्राद्ध म्हणतात. असे मानले जाते की, मृत्यू देवता भगवान यम पितृपक्षात जीव मुक्त करतात, जेणेकरून त्यांना मुक्ती मिळते. भाद्रपद महिन्यातील प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते. आजपासून पितृपक्ष सुरू झाला असून तो १७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

कोणाला म्हटलं जातं पित्र?

ज्याच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती मग ते विवाहित किंवा अविवाहित असो, मूल किंवा वृद्ध, महिला किंवा पुरुष, मरण पावले असतील त्यांना पित्र म्हटले जाते, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूर्वजांना श्राद्ध केले जाते. पूर्वज प्रसन्न झाल्यास घरात शांतता निर्माण होते.

जेव्हा श्राद्धाची तारीख ठाऊक नसेल…

पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. ज्या तारखेला आपल्या कुटुंबातील कोणाचाही मृत्यू होतो तेव्हा त्या तारखेला श्राद्ध म्हणतात. बर्‍याच लोकांना त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची तारीख आठवत नाही, अशा परिस्थितीत शास्त्रांनुसार अश्विन अमावस्येला पित्रांचे श्राद्ध केले जाऊ शकते. म्हणूनच, या अमावस्येस सर्वपित्रीअमावस्या असेही म्हणतात.

…म्हणून या १५ दिवसांच्या काळाला पितृपक्ष म्हटले जाते

असे म्हटले जाते की, जेव्हा महाभारताच्या युद्धात दानवीर कर्ण मरण पावला आणि त्याने स्वर्गात प्रवेश केला, तेव्हा त्याला नियमित अन्नाऐवजी सोने आणि दागिने देण्यात आले. यामुळे निराश होऊन कर्णाच्या आत्म्याने इंद्रदेवला याचे कारण विचारले. तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितले की, आपण आयुष्यभर इतरांना सोन्याचे दागिने दान केले, परंतु आपल्या पूर्वजांना कधीही अन्नदान केले नाही. मग कर्णाने उत्तर दिले की, मला माझ्या पूर्वजांविषयी काहीच माहिती नाही आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर भगवान इंद्रांनी त्याला १५ दिवसांसाठी पृथ्वीवर परत जाण्याची परवानगी दिली. जेणेकरुन तो आपल्या पूर्वजांना अन्नदान करू शकेल. याच १५ दिवसांचा कालावधीला पितृ पक्ष म्हणून ओळखले जाते.


पितृपक्ष म्हणजे नेमकं काय? वाचा कधी सुरू होणार पितृपंधरवडा आणि त्याचं महत्त्व!
First Published on: September 2, 2020 9:46 AM
Exit mobile version