Pizza Day : गुगलचे आज भारतात ‘पिझ्झा डे’ सेलिब्रेशन ; Pizza Doodle चे कारण काय? पॉप्यूलर पिझ्झा मेन्यू लिस्ट पहाच

Pizza Day : गुगलचे आज भारतात ‘पिझ्झा डे’ सेलिब्रेशन ; Pizza Doodle चे कारण काय? पॉप्यूलर पिझ्झा मेन्यू लिस्ट पहाच

Pizza Day : गुगलचे आज भारतात 'पिझ्झा डे' सेलिब्रेशन ; Pizza Doodle चे कारण काय? पॉप्यूलर पिझ्झा मेन्यू लिस्ट पहाच

आज अनेक जण पिझ्झा, बर्गर अशा गोष्टी फास्ट फूड खाण्याला पसंती देतात. विशेषत: तरुण वर्ग पिझ्झाचा मोठा चाहता आहे. त्यामुळे कोणाचाही वाढदिवस असो, पार्टी किंवा छोटाखानी कार्यक्रम असो स्वस्तात मस्त पिझ्झा पार्टीचा बेत हा आखलाच जातो. त्यामुळे भारतात पिझ्झा चवय्यांची मोठी लिस्ट आहे. गुगलकडूनही आज जगभरातील सर्वात पॉप्युलर डिश पिझ्झा डे सेलिब्रिट केला जात आहे. यासाठी आज गुगलचे डुडल देखील रोजच्यापेक्षा खूपचं युनिक आहे. या डुडलमध्ये गुगलने युजर्सला एक पिझ्झा कटिंगचा गेम दिला आहे. दरम्यान २००७ मध्ये युनिस्कोच्या प्रतिनिधी सूचीमध्ये नोपिलीटन पिझाइउलो बनवण्याची पद्धत समावेश केली. या पिझ्झाचे वर्णन अमूर्त सांस्कृतिक म्हणून केले जाते. यामुळे आजच्या लोकप्रिय पिझ्झा डिशचा गुगल डूडलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या डूडलमध्ये जगभरातील ११ सर्वाधिक लोकप्रिय पिझ्झा टॉपिंग्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक कोडं दिलं असून युजर्सला पिझ्झा कोणत्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे त्या पिझ्झाचे तुकडे करायचे आहेत. यात तुमचे स्लाइस जितक्या अचूक असलीत तितके जास्त स्टार्स तुम्हाला मिळणार आहेत.

युजर्सना कापण्यासाठी दिले ११ पॉप्यूलर पिझ्झा मेन्यू लिस्ट

१) मार्गेरिटा पिझ्झा (पनीर, टोमॅटो, तुळस)

२) पेपरोनी पिझ्झा (पनीर, पेपरोनी)

३) व्हाइट पिझ्झा (पनीर, व्हाईट सॉस, मशरूम, ब्रोकोली)

४) कॅलाब्रेसा पिझ्झा (पनीर, कॅलाब्रेसा, कांद्याच्या रिंग, होल ब्लॅक ऑलिव्ह)

५) मुझरेला पिझ्झा (चीज, ओरेगॅनो, होल ग्रीन ऑलिव्ह)

६) हवाईयन पिझ्झा (चीज, हॅम, अननस)

७) मॅग्यारोस पिझ्झा (चीज, सलामी, बेकन, कांदा, पेपर मिरची)

८) टेरियाकी मेयोनेझ पिझ्झा (चीज, टेरियाकी चिकन सीवीड, मेयोनेझ)

९) टॉम यम पिझ्झा (चीज, कोळंबी, मशरूम, मिरची, लिंबाची पाने)

१०)नपनीर टिक्का पिझ्झा (चीज, कॅप्सिकम, कांदा, लाल मिरची)

११) मिठाई पिझ्झा

इजिप्तपासून ते अगदी रोमपर्यंत प्राचीण संस्कृतीमध्ये शतकानुशतके टॉपिंग्जसह फ्लॅटब्रेडचा वापर केला जात होता. मात्र नैर्ऋत्य इटालियन शहर नेपल्समध्ये १७०० शतकाच्या उत्तरार्धात पिझ्झाचा जन्म झाला. (टोमॅटो आणि पनीर असलेले पीठ), मात्र आर्थिक बदलाबरोबर पिझ्झा बनवण्याची पद्धतगी काळानुसार बदलत गेली, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी सुमारे पाच अब्ज पिझ्झा रोज खाल्ले जातात. एकट्या अमेरिकेत प्रति सेकंद ३५० स्लाइसची विक्री होतेय.

नेपोलिटन ‘पिझ्झाउलो’ रेसिपी काय आहे?

युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) च्या मते, नेपोलिटनमधील ‘पिझ्झाइओलो’ ही कला एक पाककला आहे. ज्यामध्ये पीठ तयार करणे आणि लाकूड ओव्हनमध्ये शिजवण्यासंबंधी चार वेगळ्या स्टेप्स आहेत. त्यापैकी एक बेकरच्या रोटेशनल मूव्हमेंटचा समावेश आहे.” या पिझ्झाचा उगम कॅम्पानिया प्रदेशाची राजधानी नेपल्स येथे झाला आहे, जिथे आता सुमारे ३००० पिझ्झाउओली राहतात. Pizzaioli संबंधित देशासाठी एक जिवंत संसकृती आहे. UNESC नुसार, तीन प्राथमिक श्रेणी आहेत – मास्टर पिझ्झाओलो, पिझ्झाइउलो आणि बेकर – तसेच नेपल्समधील कुटुंबे त्यांच्या घरात ही पिझ्झा बनवण्याची कला जपत आहेत.

 

First Published on: December 6, 2021 9:58 AM
Exit mobile version