आपत्कालीन लँडिंगसाठी विमान अचानक रस्त्यावर उतरले, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

आपत्कालीन लँडिंगसाठी विमान अचानक रस्त्यावर उतरले, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील महामार्गावर एका लहान विमानाने धोकादायक लँडिंग केले. या लँडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिंगल-इंजिन असलेल्या सेसना विमानाने मंगळवारी दुपारी कॅलिफोर्नियामधील कोरोना येथील ९१ फ्रीवेवर आपत्कालीन लँडिंग केले. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक विमान आपत्कालीन लँडिंग करताना दिसत आहे. लँडिंग करताना या विमानाचे पंख एका गाडीला आदळतात. मग हे विमान दोन-तीन वेळा हवेत हेलकावे खात जमिनीवर आदळते. विमान  जमिनीवर आदळताच पाठीमागे मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा दिसत आहेत.

कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल (CHP) ने सांगितले की, सुदैवाने पायलट आणि प्रवासी दोघेही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. तीन जणांसह विमान एका ट्रकलाही धडकले. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


पायलट अँड्र्यू चो यांनी सांगितले की, छोट्या प्रवासासाठी कोरोना म्युनिसिपल विमानतळावरून मी एक विमान घेऊन निघालो. मात्र, अचानक विमानाची बॅटरी संपली. त्यामुळे विमानाचं अचानक लँडिंग करावं लागलं. या लँडिंगसाठी जागा शोधत असताना हा अपघात घडला.

First Published on: August 11, 2022 4:45 PM
Exit mobile version