PM Kisan : ३० जूनपर्यंत तातडीने ‘ही’ दोन्ही कामे करा होईल फायदा

PM Kisan : ३० जूनपर्यंत तातडीने ‘ही’ दोन्ही कामे करा होईल फायदा

तुम्ही PM Kisan चे सदस्य आहात का? जर नसाल तर तुम्हाला ३० जूनपर्यंत नोंदणी करण्याची संधी आहे. यामध्ये नोंदणीनंतर तुम्हाला दोन हप्ते मिळू शकतात. तिसरा हप्ता ऑगस्टमध्ये देण्यात येणार आहे. तसेच, तुम्ही किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतले असल्यास, दंड न भरण्यासाठी देण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. त्यामुळे या दोन्ही कामांचा कालावधी एकाचवेळी आहे. कोरोना महामारीमध्येही या योजनेतून कोट्यवधी लोकांना २ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

असे बना PM Kisan चे सदस्य?

जर तुम्हाला PM Kisanचे सदस्य व्हायचे असेल तर तुम्ही या योजनेसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसरमार्फत अर्ज करू शकता. याशिवाय या योजनेसाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारेही नोंदणी करू शकता. याशिवाय या योजनेसाठी PM Kisan पोर्टलद्वारेही अर्ज करता येणार आहे.

तुम्ही स्वतः करू शकता अर्ज

सरकार आत्मनिभार भारत योजनेंतर्गत पीएम किसान सदस्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देत आहे. या कार्डवर सहज आणि स्वस्त कर्ज उपलब्ध असणार आहे. परंतु हे आवश्यक आहे की कर्जाची परतफेड नियोजित तारखेपर्यंत केली पाहिजे. त्यानंतर, आपल्याला अधिक व्याज द्यावे लागणार आहे. या कर्जाच्या परतफेडीवर तीन टक्के अधिक व्याज द्यावे लागणार नाही. यासह केसीसीचे पैसे निश्चित तारखेला व्याजासह बँकेत परत करावे लागतात. अन्यथा ४ टक्केऐवजी ७ टक्के व्याज बँक आकारते. यावर्षी त्याची शेवटची तारीख वाढविण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे केंद्र सरकारने दोन वेळा किसान क्रेडिट कार्डवर कर्जाची रक्कम जमा करण्याची तारीख वाढविली होती. ते नियोजित तारखेपासून ३१ मार्च २०२० पर्यंत ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आले होते त्यानंतर ते ३१ ऑगस्ट २०२० मध्ये बदलण्यात आले. यावर्षी २०२१ मध्येही सरकारने ३ महिन्यांची स्थगिती दिली आहे. मात्र प्रत्येकाला ३० जूनपर्यंत कर्जाची रक्कम जमा करावी लागणार आहे.

First Published on: June 14, 2021 6:09 PM
Exit mobile version