प्रत्येक नागरिकाचा हेल्थ रेकॉर्ड होणार सुरक्षित, मोदींकडून ‘Digital Health Mission’ चा शुभारंभ

प्रत्येक नागरिकाचा हेल्थ रेकॉर्ड होणार सुरक्षित, मोदींकडून ‘Digital Health Mission’ चा शुभारंभ

विधानसभा निवडणुका पुढे ढकला, रॅली थांबवा; उच्च न्यायालयाचे PM मोदी अन् निवडणुक आयुक्तांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेचे शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या मोहिमेचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी भाषणातून ‘आयुष्मान भारत- डिजीटल मिशन आता देशातील सर्व रुग्णालयांना डिजिटल हेल्थ सोल्यूशंसला एकमेकांसह जोडणार आहे. या माध्यमातून देशवासियांना आता डिजिटल हेल्थ आयडी उपलब्ध होईल, या हेल्थ आयडीवर प्रत्येक नागरिकाची डिजिटल माहिती सुरक्षित ठेवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

सध्या ही डिजिटल मोहीम सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, कोरोना काळात टेलिमेडिसिनचा विस्तार मोठ्याप्रमाणात वाढला. ई-संजीवनीच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास सव्वा कोटी रिमोट कंसल्टेशन पूर्ण झाले आहे. या सुविधेच्या माध्यमातून दररोज कोसो दूर राहणाऱ्या हजारो देशवासियांना घर बसल्या मोठ्या शहरांतील हॉस्पीटलमधील डॉक्टरांच्या संपर्कात राहता येते.

मोदी म्हणाले की, देशात गेल्या सात वर्षात आरोग्य सुविधांना अधिक मजबूत करण्यासाठी जे अभियान सुरु आहे ते आज नव्या टप्प्यात प्रवेश करतयं. आज असे मिशन सुरु होतेय ज्यात भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन करण्याची ताकद आहे. त्यामुळे संपूर्ण देशात आज आयुष्मान भारत डिजिटल मिशन सुरु होतेय याचा मला आनंद होतोय. या माध्यमातून देशातील गरीब, मध्यम वर्गीय नागरिकांना आरोग्य सेवांमधील अडचणी दूर करण्याची महत्त्वाची भूमिका निभावली जाईल.

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हणाले की, देशात आज १३० कोटी आधार नंबर, ११८ कोटी मोबाईल सब्सक्रायबर, जवळपास ८० कोटी इंटरनेट यूजर्स तर ४३ कोटी जनधन बँक खाती आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कनेक्टेड इंफ्रास्ट्रक्चर जगात कुठेही नाही. ही डिजीटल इंफ्रास्ट्रक्चर राशन कार्डवरील धान्यापासून ते सरकारी कामं अगदी पारदर्शकतेने नागरिकांपर्यंत पोहचवली जातात. आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेच्या शुभारंभावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित होते.

आयुष्मान भारत डिजिटल अभियान एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करेल, जे डिजिटल हेल्थ इको सिस्टम अंतर्गत इतर आरोग्य क्षेत्राशी संबंधीत पोर्टल्सची इंटरऑपरेबिलिटी अधिक मजबूत करेल. राष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (एनएचए) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ही मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत, नागरिकांना आरोग्य ओळखपत्र (हेल्थ आयडी) दिले जाईल, जे त्यांच्या आरोग्य खात्यासाठी कमाचे असेल. या आयडीद्वारे, एखादी व्यक्ती मोबाईल अॅपद्वारे त्याच्या आरोग्याच्या नोंदी पाहू शकेल. डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांसाठी व्यवसाय सुलभ होईल. मोहिमेचा भाग म्हणून तयार केलेला आयुष्मान भारत डिजिटल मिशन सँडबॉक्स तंत्रज्ञान आणि उत्पादन चाचणीसाठी एक चौकट म्हणून काम करेल.


 

First Published on: September 27, 2021 12:51 PM
Exit mobile version