Bharat Bandh, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि प्रकाशसिंह बादल यांच्यात आहे असा योगायोग!

Bharat Bandh, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि प्रकाशसिंह बादल यांच्यात आहे असा योगायोग!

नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या १३ दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहे. दरम्यान, अकाली दल नेता आणि पंजाबचे माजी पूर्व मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचा आज वाढदिवस आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश सिंह बादल यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. योगायोग म्हणजे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात प्रकाश सिंह बादल यांनी आपला पद्मविभूषण सन्मान परत केला होता. आज देशात यासंदर्भात देशव्यापी बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली असून आजच्या दिवशीच त्यांचा वाढदिवस असल्याचे समजतेय.

प्रकाश सिंह बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी झाला असून ते कित्येक वर्षांपासून पंजाबचे मुख्यमंत्री होते. प्रकाश बादल यांच्या नेतृत्वात शिरोमणी अकाली दल बऱ्याच कालावधीसाठी भाजपाचे सहयोगी देखील होते. अलीकडे संसदेमधून तीन कृषी कायदे मंजूर झाले तेव्हा अकाली दलाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अगदी प्रकाश सिंह बादल यांचा मुलगा सुखबीर बादल यांची पत्नी हरसिमरत बादल यांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.

अशाप्रकारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एनडीएपासून अकाली दलाला वेगळे केले आहे. मात्र आता पंजाबचा शेतकरी १२ ते १३ दिवसांपासून दिल्ली सीमेवर उभा आहे आणि भारत बंदची हाक दिली आहे, या दरम्यान पंतप्रधान मोदींनी प्रकाश सिंह बादल यांना बोलावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची माहिती मिळतेय. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश सिंह बादल यांनी स्वत: पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते. पत्रात प्रकाश सिंह बादल यांनी आणीबाणी सारख्या शब्दांचा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदींमधील संघर्ष संपवण्याचे सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण सन्मान परत केला होता. प्रकाशसिंह बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून कृषी कायद्याविरोधात निषेध व्यक्त केला. यासह शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण सन्मान परत परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपतींना एक पत्रही लिहिले आहे.

असे म्हणाले प्रकाशसिंह बादल…

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना २०१५ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. आता केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांचा विरोध करत हा पुरस्कार परत करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘मी इतका गरीब आहे की शेतकऱ्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळे आहे. त्यामुळे जर आज शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर असा कोणताही पुरस्कार बाळगण्याचा काहीच फायदा नाही.’


फायझर, सीरमनंतर स्वदेशी कंपनीचाही आपत्कालीन वापरासाठी DCGI कडे अर्ज

First Published on: December 8, 2020 3:17 PM
Exit mobile version