पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांशी साधणार संवाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांशी साधणार संवाद!

देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. संसदेचं सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चिक काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ८ वाजता ते देशवासियांना संदेश देणार आहेत. गेल्या आठवड्यात मोदींनी अशाच प्रकारे संध्याकाळी ८ वाजता जनतेसमोर येत रविवारच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. आता पुन्हा मोदी बोलणार असल्यामुळे आता कोणती नवी घोषणा ते करतात, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

देशभरात कर्फ्यू लागणार?

गेल्या आठवड्यात मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे रविवारी देशभरातून जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनता कर्फ्यू पाळला होता. तसेच, संध्याकाळी ५ वाजता घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहून घंटानाद, थाळीनाद, टाळीनाद देखील केला. त्यामध्ये काही महाभागांनी थेट रस्त्यावर उतरून, मोर्चा काढून जल्लोष केला. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. मात्र, या जनता कर्फ्यूची घोषणा करताना मोदींनी ‘हा अनुभव आपल्याला पुढे कामी येईल’, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता पंतप्रधान देशभरात कर्फ्यूची घोषणा करतील की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे.


CoronaVirus: आता व्होडका तयार करणार २४ टन सॅनिटायझर!
First Published on: March 24, 2020 1:59 PM
Exit mobile version