पंतप्रधान मोदी आज 5 लाख 21 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न करणार पूर्ण; ‘या’ राज्यातील लोकांना मिळणार घरं

पंतप्रधान मोदी आज 5 लाख 21 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न करणार पूर्ण; ‘या’ राज्यातील लोकांना मिळणार घरं

पंतप्रधान मोदी आज 5 लाख 21 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न करणार पूर्ण; या राज्यातील लोकांना मिळणार घरं

प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यामातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 5 लाख 21 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे. पीएम मोदी आवास योजना ग्रामीण अंतर्गत बांधलेली घरे ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांना देणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. दरम्यान मध्यप्रदेशमधील 5 लाख 21 हजार कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळाला आहे,

गरिबांना पक्की घरे देण्याचा प्रयत्न

देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला सर्व मूलभूत सुविधांसह पक्के घर देण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केला जात आहे. या दिशेने हे आणखी एक पाऊल मानले जातेय.

मध्य प्रदेशातील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) ची अंमलबजावणी अनेक अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पायऱ्या पाहत आहेत. महिला गवंडीसह हजारो गवंडींना प्रशिक्षण, फ्लाय अॅश विटांचा वापर, महिला बचत गट (SHGs) यासारख्या प्रकल्पांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून सामग्री केंद्रीत करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सशक्त बनण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

प्रधानमंत्री आवास योजना काय आहे?

1 एप्रिल 2016 रोजी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत या योजनेअंतर्गत 24 लाख 10 हजारांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. या योजनेचे उद्दिष्ट 2024 पर्यंत सर्व पात्र बेघर कुटुंबांसाठी आणि कच्चा आणि तुटलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी पक्की घरे बांधण्याचे आहे.


 

First Published on: March 29, 2022 9:35 AM
Exit mobile version