भांडवलदारांच्या फायद्यासाठीच मोदींनी केली नोटबंदी – राहुल गांधी

भांडवलदारांच्या फायद्यासाठीच मोदींनी केली नोटबंदी – राहुल गांधी

राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतल्या भांडवलदारांचा फायदा करण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला. काळा पैसा पांढरा करण्याची एक नामी संधी या निर्णयामुळे देशातल्या निवडक भांडवलदारांना मिळाली. या एका निर्णयाने देशाचे खुप मोठे नुकसान झाले असल्याचे राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. नोटबंदीनंतर बँकामध्ये ९९.३ टक्के नोटा परत जमा झाल्या असल्याचा वार्षिक अहवाल कालच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला. यावर आज राहूल गांधी यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरेल. “नोटबंदी हा चुकीचा निर्णय नव्हता तर जाणूनबुजून जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचे कारस्थान होते.”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले की, १५ ते २० भांडवलदारांच्या फायद्यासाठी नोटबंदी केली. मात्र त्याचा भुर्दंड देशातील जनतेला भरावा लागला. नव्या नोटांच्या छपाईसाठी ८ हजार कोटींचा खर्च करण्यात आला. १५ लाख लोकांनी आपले रोजगार गमावले. १०० पेक्षा जास्त लोकांचा पैसे बदलण्यासाठी रांगेत उभे राहिले असता मृत्यू झाला. तर देशाच्या जीडीपीमध्ये १.५ टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे राहुल यांनी सांगितले.

नोटबंदी झाल्यानंतर गुजरातमधील एका बँकेत ७०० कोटी रुपये बदलण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या राज्यात हे कसे काय झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या राज्यात हे कसे काय झाले? नोटबंदीने छोट्या उद्याजोकांचे कंबरडे मोडले. बेरोजगारीत कमालीची वाढ झाली. देशातील कोट्यवधी जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र दुसऱ्या बाजुला मोदींनी जी आश्वासने दिली होती ती मात्र अद्याप पुर्ण केलेली नाहीत. जसे की, १५ लाख रुपये जनतेच्या खात्यात जमा होणार होते, शेतीमालाला हमीभाव देणार होते, वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करणार होते, काळा पैसा परत आणणार होते, यापैकी एकही आश्वासन त्यांनी पुर्ण केलेले नाही. देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत फक्त निवडक भांडवलदाराच्या हिताचे निर्णय मोदी घेत असल्याचे गांधी यांनी सांगितले.

First Published on: August 30, 2018 6:41 PM
Exit mobile version