टिकटॉकला आत्मनिर्भरतेची टक्कर!

टिकटॉकला आत्मनिर्भरतेची टक्कर!

सीमेवर भारताविरोधात कारवाई करायची आणि दुसर्‍या बाजूला भारतीय बाजारपेठ काबीज करायची, अशी दुतोंडी भूमिका घेणार्‍या चीनला दणका देताना केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅप बॅन तर केलेच. परंतु, आता एक पाऊल पुढे टाकत भारताला अ‍ॅप निर्मितीत स्वावलंबी बनवण्याची योजना तयार करणे सुरू केले आहे. पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी ट्विट करत देश आता स्वावलंबी भारत अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेन्ड लॉन्च करत असल्याचे म्हटले आहे. आज मेड इन इंडिया अ‍ॅप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. यामुळे @GoI_MeitY आणि @AIMtoInnovate हे संयुक्तपणे इनोव्हेशन चॅलेंज सुरू करत आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.

जर तुमच्याकडे असे एखादे प्रोडक्ट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे काही चांगले करण्याचा दृष्टीकोन आणि क्षमता आहे, तर मग तुम्ही टेक कम्युनिटीला नक्कीच जोडले जा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी लिंक्डइनवर आपले हे विचार मांडले आहेत.

भारत सरकारने देशात लोकप्रिय झालेल्या चीनच्या अनेक अ‍ॅपवर बंदी घातली आहे. ही अ‍ॅप्स कमाईदेखील चांगली करत होते. पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात चीनच्या कारवाईनंतर दुखावलेल्या भारताने हे पाऊल उचलले. या अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक समस्या देखील होत्या. हे देखील ही अ‍ॅप बॅन करण्याचे एक कारण दिले जात आहे. भारताच्या या निर्णयानंतर चीनला तिळपापड झाला. भारताने ज्या चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे, त्यांमध्ये टिकटॉक आणि यूसी ब्राउझर या भारतात अत्यंत लोकप्रिय अ‍ॅपचाही समावेश आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोर्‍यात भारत-चीन सीमावादानंतर भारताने ही कारवाई केली आहे.

First Published on: July 5, 2020 6:41 AM
Exit mobile version