“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फिटनेस व्हिडीओ विचित्र”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फिटनेस व्हिडीओ विचित्र”

दिल्लीत काँग्रेसची इफ्तार पार्टी

पं तप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींना टीका केली आहे. दिल्लीतील इफ्तार पार्टीत राहुल गांधींना मोदींच्या फिटनेस व्हिडीओबद्दल विचारले असता त्यांनी “विचित्र” अशी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या वतीने दिल्लीत रमपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींना टीका केली आहे. दिल्लीतील इफ्तार पार्टीत राहुल गांधींना मोदींच्या फिटनेस व्हिडीओबद्दल विचारले असता त्यांनी “विचित्र” अशी प्रतिक्रिया दिली. झान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी देखील उपस्थित होते. राहुल गांधींनी जरी मोदींचा फिटनेस व्हिडीओ “विचित्र” असल्याची प्रतिक्रिया दिली असली तरी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र मौन बाळगणे पसंत केले. काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत कम्युनिस्ट पार्टीचे ( एम ) नेते सीताराम येचुरी  देखील उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी येचुरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओबद्दल विचारले त्यांनी “आम्हाला तरी सोडा” अशी मिश्लिक टीप्पणी केली. दरम्यान, राहुल गांधींनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

कसा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ

क्रिकेटर विराट कोहलीने ट्विटरवर फिटनेस व्हिडीओ अपलोड करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिले. मोदींनी देखील विराट कोहलीचे चॅलेंज स्वीकारत आपला फिटनेस व्हिडीओ ट्विटवर अपलोड केला. शिवाय त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मोनिका बत्रा यांना फिटनेस चॅलेंज दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फिटनेस चॅलेंज मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नाकारले. यावेळी कुमारस्वामी यांनी “मला राज्याच्या तब्येतीची काळजी असून तुमच्या सहकार्याची गरज आहे” असे रिट्विट केले.

अध्यक्षपद आणि पहिलीच इफ्तार पार्टी

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांची पहिलीच इफ्तार पार्टी आहे. यावेळी माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी, प्रतिभा पाटील, काँग्रेसचे प्रमुख नेते आणि रशियाचे राजदूत देखील या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.

First Published on: June 14, 2018 2:38 AM
Exit mobile version