आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

नरेंद्र मोदी

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा चौथा ‘मन की बात’चा कार्यक्रम आहे. मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्यातील शेवटच्या रविवारी होत असतो. त्यामुळे आज नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.

काल मोदींनी ट्विट करून या कार्यक्रमाकरिता सूचना मागवल्या होत्या. तसंच आपला संदेश १८००-११-७८०० फोन नंबरवर रेकॉर्ड करावा किंवा MyGov आणि NaMo अॅप लिहून पाठवावा, असं मोदींनी आवाहन केलं होत.

आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ हजारहून अधिक आहे. त्यापैकी ८२५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ५ हजारहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ हजारहून अधिक आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे.


हेही वाचा – केंद्राचा लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय, पण…. महाराष्ट्रात दुकाने सुरु होणार नाहीत!


 

First Published on: April 26, 2020 9:03 AM
Exit mobile version