कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ मंत्र्यांसोबत घेतली आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ मंत्र्यांसोबत घेतली आढावा बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात भारताच्या प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत राष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत दिल्लीसह विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, कॅबिनेट सचिव, आयसीएमआरचे महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत नीती आयोगाचे सदस्य आणि वैद्यकीय आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचा अधिकार असलेल्या गटाचे संयोजक डॉ. विनोद पॉल यांनी कोरोना प्रकरणांची सद्यस्थिती आणि संभाव्य परिस्थितीबद्दल तपशीलवार सादरीकरण केलं. यामध्ये असं आढळून आलं आहे की एकूण प्रकरणांपैकी दोन तृतीयांश प्रकरणे केवळ ५ राज्यात आहेत आणि त्यापैकी मोठ्या संख्येने ही शहरांमध्ये आहेत. विशेषत: मोठ्या शहरांमध्ये ज्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे ते पाहता चाचणी वाढवण्याबरोबरच दररोजच्या वाढत्या प्रकरणांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी बेडची उपलब्धता आणि सेवा यावरही चर्चा करण्यात आली.


हेही वाचा – येत्या २४ तासात मान्सून उर्वरीत राज्य व्यापणार


राजधानी दिल्लीत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. गृहमंत्री अमित शाह स्वत: केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. उद्या रविवारी गृहमंत्री कार्यालयात ही बैठक होणार आहे.


हेही वाचा – सरकार स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना लुटतंय – कपिल सिब्बल


 

First Published on: June 13, 2020 7:09 PM
Exit mobile version