‘गळाभेट आणि गळ्यात पडणं’ यात फरक असतो; मोदींचा राहुल गांधींना टोला

‘गळाभेट आणि गळ्यात पडणं’ यात फरक असतो; मोदींचा राहुल गांधींना टोला

१६ लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत १६ व्या लोकसभेतील शेवटचे भाषण केले. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना चांगलेच धारेवर धरले. या सभागृहात मला गळाभेट आणि गळ्यात पडणे यातला फरक पहिल्यांदाच कळाला, अशी कोपरखळी मोदी यांनी राहुल गांधी यांना लगावली. अनेक विमाने उडवण्यात आली मात्र लोकशाहीची उंची गाठू शकेल असे एकही विमान त्या उंचीपर्यंत जाऊ शकले नाही, असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

मागच्या पाच वर्षांच्या कालावधीत जागतिक पातळीवर भारताला गांभीर्याने घेतले जात आहे. गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच पुर्ण बहुमताचे सरकार देशाला लाभले. त्यामुळेच आपण चांगली कामगिरी करु शकलो. हे यश ज्या जनतेने २०१४ साली पुर्ण बहुमताचे सरकार निवडले त्या जनतेचे असल्याचे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

यावेळी मोदी यांनी आपल्या काळात झालेल्या कामांची पुन्हा उजळणी केली. याकाळात २१९ विधेयक संसदेत आणली असून त्यातील २०३ मजूंर झाली आहेत. नोटबंदी, जीएसटीसारखे मोठे निर्णय झाले. तसेच ग्लोबल वॉर्मिंगविरोधात लढण्यासाठी भारताने चांगले प्रयत्न केले असल्याचे देखील मोदी म्हणाले.

First Published on: February 13, 2019 5:57 PM
Exit mobile version