इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा प्रसार कमी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा प्रसार कमी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ३१ मे रोजी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी देशात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांचे हे ६५ वे मन की बात कार्यक्रम आहे. पंतप्रधानांनी देश हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे यावेळी म्हटले आहे. सावधगिरी बाळगत देशात विमानसेवा सुरू झाल्या. अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर देशातील जनतेला अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. सेवा आणि त्याग हे आमचे आदर्श आहेत. हे पुन्हा एकदा देशाने दाखवून दिले. जगाशी तुलना करताना भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी असल्याचा पुनरोच्चार मोदींनी यावेळी केला. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील ईशान्य भागाचा विकास ही आमची प्राथमिकता असून तेथे विकास होणे अंत्यक आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

First Published on: May 31, 2020 11:19 AM
Exit mobile version