Corona Vaccine : देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार कोरोना लस; PM मोदींचा दावा

Corona Vaccine : देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार कोरोना लस; PM मोदींचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाचे संकट अजूनही देशासह जगभरात कायम आहे. अशात कोरोनावरील लस कधी येणार याचीच सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात सध्या कोरोनाच्या काही लसींची चाचणी केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत दिलासादायक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात जेव्हा कधी कोविड लस उपलब्ध होईल, तेव्हा प्रत्येक नागरिकाला त्याची लस दिली जाईल. कोणीही त्यापासून वंचित राहणार नाही.

पंतप्रधान मोदींना कोरोना लसीबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी म्हटले की, मी देशाला आश्वासन देऊ इच्छितो की, देशात जेव्हा कधी कोरोना लस उपलब्ध होईल तेव्हा ती सर्वांना दिली जाईल. कोरोना संकटाबाबत पंतप्रधान म्हणाले की, भारत सरकारने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि लोकांच्या मदतीमुळे कित्येकांचे प्राण वाचले. लॉकडाऊन लावणे आणि अनलॉक करणे यांची वेळ योग्य होती. तसेच कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अशात लोकांनी सावध राहणे, काळजी घेणे गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात लोकांनी आणखी सतर्क राहणे आवश्यक आहे. ही वेळ कोणत्याही प्रकारची मोकळीक देण्याची नाही, असेही मोदींनी नमूद केले.

केंद्र सरकारमार्फत २०२१ पर्यंत २० कोटी ते २५ कोटी भारतीयांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. ही लस देताना ठराविक प्राधान्याने देण्यात येणार आहे. कोरोना विरोधात केंद्र सरकारपासून राज्य सरकार अशी सगळीच यंत्रणा कामाला लागली आहे. पण कोरोनाची लस कशी द्यायची याबाबत सरकार प्राधान्यक्रम ठरवत आहे. त्यानुसार पुढच्या वर्षापर्यंत लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल असा सरकारचा अंदाज आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस सर्वात आधी कोणाला दिली जाईल याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

हेही वाचा –

धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न

First Published on: October 29, 2020 9:26 AM
Exit mobile version