Lockdown नंतर पंतप्रधान मोदी उद्या पुन्हा देशाला संबोधित करणार

Lockdown नंतर पंतप्रधान मोदी उद्या पुन्हा देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांना संदेश देणार आहेत. उद्या (३ एप्रिल) सकाळी ९ वाजता मोदी एक व्हिडिओ प्रसारीत करणार आहेत. अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे. आता देशवासियांना कोणता संदेश देणार याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

२४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना रात्री १२ वाजल्यापासून २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. कोरोनाचे संक्रमन रोखण्यासाठी ही उपाययोजना केली. मात्र तरिही कोरोनावर प्रतिबंध लागण्याऐवजी त्याचा प्रसार आणखी वाढला आहे. दिवसेंदिवस भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. भारत अद्याप स्टेज ३ मध्ये पोहोचला नसला तरी सध्याची परिस्थिती काळजीत भर टाकणारी आहे.

सध्य देशभरात आतापर्यंत १,९६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर जवळपास ५० लोकांचा यामुळे मृत्यू झालेला आहे. मोदींनी सोशल डिस्टसिंगद्वारे आपण कोरोनाला हरवू असे सांगितले होते. मात्र लोकांनी शिस्तीचे पालन केलेले दिसून येत नाही. अनेकठिकाणी अजूनही लोक गर्दी करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोदी काय बोलणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

First Published on: April 2, 2020 6:13 PM
Exit mobile version