PM Modi Twitter Account Hack: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक! बिटकॉइनबाबत केलेले ट्विट चर्चेत

PM Modi Twitter Account Hack: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक! बिटकॉइनबाबत केलेले ट्विट चर्चेत

Thane-Diva 5th and 6th railway line inaguration by the PM modi Today

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. अकाऊंट हॅक झाल्यानंतर काही वेळातच पुन्हा सुरळीत करण्यात आले. मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनच ही माहिती देण्यात आली. ‘पंतप्रधानांच्या @narendramodi या ट्विटर अकाऊंटसोबत छेडछाड करण्यात आली होती. मात्र त्वरित मोदींचे ट्विटर अकाऊंट सुरक्षित करण्यात आले आहे. अकाऊंट हॅक झाले तेव्हा करण्यात आलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करावे’,अशा प्रकारचे आवाहन करणाऱ्या ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली.

पंतप्रधान मोदींनी नुकतीच बिटकॉइनची कायदेशीर मान्यता नाकारली याच पार्श्वभूमीवर हँकर्सनी पंतप्रधानांना लक्ष करत ट्विटर अकाऊंट हॅक केले.  त्या दरम्यान एक ट्विट करण्यात आले जे चांगलेच चर्चेत आले आहे. भारताने बिटकॉइनला कायदेशीररित्या परवानगी दिली असल्याचे ते ट्विट होते. काही वेळाने हे ट्विट डिलीट देखील करण्यात आले. या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘भारताने बिटकॉइनला कायदेशीररित्या मान्यता दिली आहे. भारताने ५०० बिटकॉइन खरेदी केले असून देशातील लोकांना वाटत आहे’. या ट्विटनंतर सर्वत्र एकच चर्चा सुरू झाल्या. मात्र काही वेळातच मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगत या ट्विटवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले.

या आधी देखील पंतप्रधान मोदींच्या narendramodi_in या हँडलवरुन देखील २०२०मध्ये क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट करण्यात आले होते. त्यावेळी देखील मोदींचे अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले होते. भारताने क्रिप्टोकरन्सीला सुरूवात केली आहे त्या ट्विटमधून सांगण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच ते ट्विट डिलीट करण्यात आले होते.


हेही वाचा –

First Published on: December 12, 2021 9:03 AM
Exit mobile version