स्वतःमध्ये बदल करा नाहीतर मला बदल करावा लागेल, पंतप्रधान मोदींची खासदारांना तंबी

स्वतःमध्ये बदल करा नाहीतर मला बदल करावा लागेल, पंतप्रधान मोदींची खासदारांना तंबी

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक आणि संसदीय अधिवेशनात गैरहजर राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे. तुम्ही स्वतःमध्ये बदल करा अन्यथा मला पक्षात बदलाव करावा लागेल असा इशाराच भाजपच्या खासदारांना दिला आहे. तसेच त्यांना पक्षाच्या बैठकांमध्ये आणि हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कडक शिस्तीचे नेते आहेत. मोदींनी मागील महिन्यात भाजप नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला अनेक नेते गैरहजर होते. तसेच हिवाळी अधिवेशनात खासदार गैरहजर राहत असल्यामुळे मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. यावर तुम्ही बदला नाहीतर मला बदल करावा लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना उद्देशून म्हटलं आहे की, पक्षाच्या बैठकांना आणि संसदेत नियमित हजर राहत जा, प्रत्येकवेळी तुम्हाला हजर राहण्यासाठी लहान मुलांप्रमाणे सांगणे योग्य वाटत नाही. तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा अन्यथा मला काही बदल करावे लागतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षातील खासदारांना नेहमीच शिस्तीत राहण्याचे आवाहन करत असतात. तसेच बाहेर आणि माध्यमांसमोर जास्त बोलू नये असे देखील सांगत असतात. परंतु गैरहजर असलेल्या खासदारांना लहान मुलांप्रमाणे वारंवार बोलवत राहणं योग्य राहणार नाही. तुम्ही बदला नाहीतर आम्हाला तुमच्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल असा थेट इशारा पंतप्रधानांनी खासदारांना दिला आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी नागालँडमध्ये १४ शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारावरुन गदारोळ केला होता. सत्ताधारी भाजपला चांगलाच विरोध केला होता. यावेळी संसदेत भाजप खासदार गैरहजर होते. यावरुन पंतप्रधानांनी खासदारांवर निशाणा साधला आहे. तसेच गदारोळ करणाऱ्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आला आहे. या खासदारांनी माफी मागितल्याशिवाय त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा : India-Russia summit : भारत-रशियामध्ये बैठकीत राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला चीनचा मुद्दा

 


 

First Published on: December 7, 2021 3:02 PM
Exit mobile version