पंतप्रधान मोदी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल! Twitter वर फॉलोअर्सची संख्या ७ कोटी पार

पंतप्रधान मोदी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल! Twitter वर फॉलोअर्सची संख्या ७ कोटी पार

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मायक्रोब्लॉगिंग साइट अर्थात ट्विटरवर सातत्याने वाढताना दिसतेय. इतकेच नाही तर सोशल मीडियावर फॉलो केल्या जाणाऱ्या भारतीय नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात अव्वल ठरले आहेत. त्यांच्या ट्विटर हँडलवर फॉलोअर्सची संख्या ७० मिलीयन म्हणजेच ७ कोटींच्या पार गेली आहे. यासह, पंतप्रधान मोदी जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. यापूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव सर्वात टॉपला होते, ज्यांना ८८.७ मिलीयन म्हणजेच ८. ८७ कोटी लोकं ट्विटरवर फॉलो करत होते परंतु आता त्यांचे अकाऊंट बंद झाल्याचे सांगितले जात आहे.

जानेवारी २००९ पासून मोदी ट्विटरवर Active

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००९ पासून ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणं सुरू केलं आणि ते आजपर्यंत सक्रिय आहेत. २०१० मध्ये त्यांचे एक लाख फॉलोअर्स झाले होते, नोव्हेंबर २०११ मध्ये त्याच्या फॉलोअर्सची संख्या चार लाखांवर पोहोचली होती. ट्विटरवर फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे १२९.८ मिलीयनहून अधिक फॉलोअर्स होते आणि ते पहिल्या क्रमांकावर आहेत. यानंतर ओबामा राजकारणात सक्रिय नसल्याचे हे स्थान त्यांचे कमी झाल्याचे दिसून आले. तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना ट्विटरवर ३०.९ मिलीयन लोक फॉलो करतात. त्यामुळे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सक्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे.

राहुल गांधींचे १९.४ मिलीयन फॉलोअर्स

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर १९.४ मिलीयन लोक फॉलो करत आहेत. तर त्यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्सकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे असल्याचे दिसते. ट्विटरवर त्याचे २६.२ मिलीयन फॉलोअर्स आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २२.८ मिलीयन फॉलोअर्स त्यांना ट्विटरवर फॉलो करतात.

First Published on: July 29, 2021 12:22 PM
Exit mobile version