उज्ज्वला योजनेबाबत मोदींनी केलेले दावे फोल – काँग्रेस

उज्ज्वला योजनेबाबत मोदींनी केलेले दावे फोल – काँग्रेस

पंतप्रधान उज्ज्वला योजना

पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ देशातील चार कोटी नागरिकांना झाला असून यामधील ४५ टक्के लाभार्थी हे दलित आणि आदिवासी असल्याचा दावा खुद्द प्रंतप्रधान नरेंद्र मोंदींनी केला (आहे). पंतप्रधानांनाचा दावा फोल ठरवत त्यांनी केलेला दावा फक्त सामान्यांच्या डोळ्यात केलेली धुळफेक असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.

यासंबधीत क्राँग्रेसने नुकतेच ट्विट करण्यात आले. दारिद्र रेषेखालील नागरिकांना मोफत एलपीजी सेवा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ अनेकांना झाला असून आता देशभरात अनेक ठिकाणी नागरिक चुली ऐवजी गॅसचा वापर करत असल्याचा दावा मोदींतर्फे करण्यात येतोय. सरकार हे दलित आणि आदिवासी समर्थक असून ग्रामीण क्षेत्रात गॅसच्या वापराचे प्रमाण वाढले असल्याचे मोदींनी म्हंटले आहे.

“२०१४ पासून १३ कोटी कुटुंबियांना गॅसचे कनेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मागील सहा दक्षकांपासून गॅस फक्त श्रीमंत लोकांपर्यंतच पोहोचत होते. मागील चार वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत १० कोटी दारिद्र रेषेखालील लोकांना नवीन गॅस कनेक्शन मिळाले. माझ्या मित्रांमध्ये मुस्लिम बांधवांचाही समावेश आहे. रमझानच्या महिन्यात मुस्लिम महिलांना लवकर उठून चूल पेटवावी लागत होती. त्यांनाही या योजनेचा लाभ झाला आहे. ” – नरेंद्र मोदी

काँग्रेसची टीका
मात्र मोदींचा हा दावा फोल असल्याचा आरोप काँग्रेसद्वारे केला जात आहे. काँग्रेसद्वारे आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या संदर्भात नुकतीच एक चित्रफीत टाकण्यात आली. १ कोटी नागरिक अद्यापही चुलीचा वापर करतात. उज्ज्वला योजनेचा लाभ अद्यापही सर्व भारतीयांना झाला नाही. मोदी सरकारकडून करण्यात आलेले दावे हे फोल आहेत. गरिबांनाही बाजारभावा प्रमाणेच गॅस कनेक्शन मिळत आहेत. जे सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. प्रत्यक्षात या योजनेचा लाभ कोणालाही झाला नाही असा मजकूर ट्विटवरील व्हिडिओमधून देण्यात आला आहे.

 

First Published on: May 28, 2018 12:07 PM
Exit mobile version