मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवण्यासाठी अँटिग्वा सरकाने दिला नकार

मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवण्यासाठी अँटिग्वा सरकाने दिला नकार

मेहुल चोकसी

पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज थकवून भारत सोडून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र हे प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे चोक्सीला अटक करण्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणेचे प्रयत्न विफल ठरणार आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अँटिग्वा सरकारने चोक्सीला भारतात पाठवण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी विमानाची सोय करण्यात आली असल्याचा दावा शनिवारी काही वृत्तसंस्थांनी केला होता. यानंतर अँटिग्वा सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सरकारच्या या धोरणामुळे पुन्हा मेहुल चो्कसी भारतात येणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

चोक्सी भारतीय नागरिक नाही

एक वृत्तवाहिनीवर बोलताना अँटिग्वाचे पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्ट यांनी सांगितले की,”चोक्सी आता अँटिग्वाचे नागरिक आहेत ते भारतीय नागरिक नाहीत. नागरिकत्वाबरोबर त्याला दिलेले अधिकार सरकार हिकावू शकत नाही. चोक्सीला जर देशातून घेण्यासाठी कोणीही आले तर त्याची माहिती पहिला आम्हाला देणे गरजेचे आहे. आमच्या परवानगी शिवाय चोक्सी यांना जबरदस्ती कोणीही घेऊन जाऊ शकत नाही.”

चोक्सीने लावला ४०५ कोटींचा चुना

हिऱ्याचा व्यापार करणाऱ्या मेहुल चॉक्सीने पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँकला चुना लावला आहे. नीरव मोदीसोबत मिळून फेब्रुवारी २०१८ मध्ये १४०० कोटींचा घोटाळा करुन फरार झाला होता. तर मेहुल चोक्सीने आपली संपत्ती गहाण ठेवून एसबीआयचे कर्ज घेतले होते. ४०५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते जे तो फेडण्यास असमर्थ ठरला.

First Published on: January 28, 2019 10:30 AM
Exit mobile version