Video : तरुणींने दिली आत्महत्येची धमकी, उडी मारणार तेवढ्यात…

Video : तरुणींने दिली आत्महत्येची धमकी, उडी मारणार तेवढ्यात…

Video : तरुणींने दिली आत्महत्येची धमकी, तेवढ्यात...

एका तरुणींने छतावर चढून आत्महत्येची धमकी दिल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशमध्ये घडल्याचे समोर आले आहे. स्वत:चे आयुष्य संपवण्यासाठी ही तरुणी इमारतीच्या छतावर चढली. हा संपूर्ण प्रकार शेजाऱ्यांनी पाहताच त्यांनी तात्काळ या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला आत्महत्या करण्यापासून वाचवले. दरम्यान, तरुणीच्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशातील उज्जैन भागात एका तरुणींने घराच्या छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाच्या मदतीने या तरुणीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या तरुणीचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – भितीदायक! ‘या’ देशात कुत्रे, मांजरी, वाघासह सिंहाला कोरोनाचा संसर्ग!


 

First Published on: July 31, 2020 12:59 PM
Exit mobile version