Video: सीरमच्या अदर पुनावाला यांनी टोचून घेतली लस

Video: सीरमच्या अदर पुनावाला यांनी टोचून घेतली लस

सीरमच्या अदर पुनावाला यांनी टोचून घेतली लस

भारतात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी १३.३० वाजता लसीकरणाचा शुभारंभ केला. देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशसित प्रदेशांमध्ये सकाळपासून कोरोनायोद्धांना लस दिली जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस दिली जात असताना सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी देखील त्यांच्याच कंपनीची कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली आहे. पुनावाला यांनी ट्विटर लस टोचून घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अदर पुनावाला यांनी ट्विट करत लस घेतल्याची माहिती दिली आहे. “जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. याला यश लाभो अशा शुभेच्छा मी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देतो. या ऐतिहासिक प्रयत्नांचा आणि लसीच्या सुरक्षेबाबतच्या आणि प्रभावीपणाच्या दखलपात्रतेने मला मोठा सन्मान मिळवून दिला आहे. आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत मी देखील कोविडची लस घेण्याच्या मोहिमेत सहभागी होत आहे,” असं अदप पुनावाला यांनी ापल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा – लसीकरणामध्ये मला राजकारण करायचं नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

First Published on: January 16, 2021 2:59 PM
Exit mobile version