भारतावर सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता

भारतावर सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता

केवायसी अपडेटच्या नावाखाली चार लाख अकरा हजारांना गंडा

भारतामध्ये लॉकडाऊनमुळे इंटरनेट यूजर आणि इंटरनेटचा वापर कमालीचा वाढला आहे. याचबरोबर सायबर हल्लेही वाढू लागले आहेत. भारत सरकारची सायबर सिक्युरिटी नोडल एजन्सीने CERT-In हाय अलर्ट दिला आहे. CERT-In नुसार भारतात मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये खासगी व्यक्तीसह मोठमोठ्या व्यवसायांनाही धोका पोहचणार आहे. हे हल्लेखोर करोना व्हायरस किंवा त्यासंबंधी नावाचा वापर करू शकतात. याद्वारे इमेल पाठवून खासगी माहितीसह आर्थिक माहिती चोरली जाऊ शकते.

फिशिंगसारखे हातखंडे वापरून सरकारी एजन्सी, वेगवेगळी खाती आणि व्यापाराचे नाव वापरूनही हे हल्ले होऊ शकतात. या मेसेजमध्ये युजरला सरकारी मदत देण्याविषयीचे प्रलोभन दिले जाणार आहे. करोना व्हायरसशी संबंधित फिशिंग अटॅक आजपासून सुरू केला जाऊ शकतो. यासाठी ncov२०१९@gov.in; सारखे ईमेल अ‍ॅड्रेसचा वापर केला जाऊ शकतो. gov.in हा अ‍ॅड्रेस सरकारी असतो. मात्र, याची नक्कल करून खरा भासणारा ईमेल तयार केला जातो. स्थानिक प्रशासनाचे नाव वापरूनही हल्लेखोर सायबर हल्ला करू शकतात. या ईमेलवर अजिबात विश्वास ठेवू नका. यावर क्लिक केल्यास तुम्हाला त्यांचे जाळे असलेल्या लिंक्सवर रिडायरेक्ट केले जाईल.

First Published on: June 22, 2020 6:03 AM
Exit mobile version