राजस्थानमधील सत्तासंघर्ष हायकमांड दरबारी, अशोक गहलोत घेणार सोनिया गांधींची भेट

राजस्थानमधील सत्तासंघर्ष हायकमांड दरबारी, अशोक गहलोत घेणार सोनिया गांधींची भेट

Rajasthan Election Result 2023 Ashok Gehlot will submit his resignation to the Governor at 5: 30 pm

नवी दिल्ली –  काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अशोक गहलोत यांनी उमेदवारी जाहीर केल्याने राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सचिन पायलट यांना प्रखर विरोध होतोय. आता हे प्रकरण थेट हायकमांड म्हणजे सोनिया गांधींपर्यंत पोहोचल्याने याबाबत लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशोक गहलोत आज सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले.

दिल्लीत पोहोचताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. जे आपल्या हृदयात प्रथम क्रमांकावर असतात, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. भविष्यातही सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही एकजूट राहू.

राजस्थानमधील संघर्ष हा आमच्या घरातील वाद आहे. जागतिक राजकारणात यासर्व गोष्टी होत राहतात. आम्ही या प्रकरणावर तोडगा काढू, असंही अशोक गहलोत म्हणाले. राजस्थानच्या संकटापासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक गहलोत यांच्या उमेदवारीबाबत सस्पेंस आहे. अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींशी भेट घेतल्यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याच भेटीत अशोक गहलोत निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. रात्री ९.३० वाजता अशोक गहलोत दिल्लीत जाण्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत काही मंत्री आणि आमदार यांच्यासोबत मुख्यमंत्री निवासात बैठक घेतली.

First Published on: September 29, 2022 10:40 AM
Exit mobile version