साध्वी प्रज्ञा सिंह ही तर भारतमातेची निरागस कन्या

साध्वी प्रज्ञा सिंह ही तर भारतमातेची निरागस कन्या

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य संशयित म्हणून सुमारे 9 वर्षे तुरूंगवास भोगणाऱ्या आणि नुकत्याच मुंबई हल्लयातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून निवडणूक आयोगाच्या दोन नोटीसा प्राप्त झालेल्या भाजपाच्या भोपाळ येथील लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भारतमातेची देशभक्त निरागस कन्या असल्याचे वक्तव्य मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. इतकेच नव्हे, तर भोपाळमधून प्रज्ञासिंह मोठ्या फरकाने विजयी होतील असे भाकितही त्यांनी करून टाकलेय. ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहेत.

सप्टेंबर 2008मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटात 6 निरागस लोकांचा बळी गेला होता, तर 100 जण जखमी झाले, त्यापैकी काहीजण आयुष्यभर अपंग झाले. मात्र या स्फोटाप्रकरणी प्रज्ञा सिंह यांच्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचेही शिवराज सिंह यांनी म्हटले आहे. साध्वीला ताब्यात घेताना कायद्याचा गैरवापर केला गेला, इतकेच नव्हे, तर अटकेत असताना तिला अमानूष वागणूक दिली केली. साध्वीसोबत झालेल्या अन्यायाचे वर्णन ऐकून एखाद्याच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र एटीएसचे तत्कालिन प्रमुख हुतात्मा हेमंत करकरे हे देशद्रोही, धर्मद्वेष्टे असून माझ्या शापानेच अतिरेक्यांकरवी त्यांचा मृत्यू झाला असे वादग्रस्त विधान भोपाळ येथील एका सभेत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. त्यानंतर देशभर साध्वीविरोधात संतापाची लाट उसळली. मात्र साध्वीच्या उमेदवारीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठराखण केली, तर भाजपाने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते.

करकरेंना माझा शाप भोवला

First Published on: April 22, 2019 2:12 PM
Exit mobile version