साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना NIAच्या कोर्टाकडून मोठा दिलासा

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना NIAच्या कोर्टाकडून मोठा दिलासा

PRADNYA SINGH

भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना मुंबईच्या विशेष कोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबईच्या एनआयए कोर्टाने प्रज्ञा यांना मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याचे कारण सांगून प्रज्ञा यांनी कोर्टात हजर राहण्यासंदर्भातली सूट मागितली होती. आज कोर्टाने ही मागणी मान्य करुन प्रज्ञा यांना मोठा दिलासा आहे.

साध्वी प्रज्ञा यांच्यावर मालेगाव ठिकाणी एका मशिदीबाहेर स्फोट घडवल्याचा आरोप आहे. या घटनेत सहाजणांचा मृत्यू झाला होता. यामुळे प्रज्ञा ठाकूर यांना आठवड्यातून एकदा कोर्टात हजर राहावे लागेल, असे कोर्टाने आदेश दिले होते. परंतु लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काही काळासाठी कोर्टात हजर राहण्यासाठी मुभा मिळावी, अशी मागणी प्रज्ञा यांनी कोर्टात केली होती. परंतु, गुरुवारी ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली होती. “मी खासदार असल्याने रोज संसदेच्या कामकाजात मला भाग घ्यावा लागतो”. असे कारण प्रज्ञा यांनी दिले होते. त्यानंतर आज न्यायालयाने प्रज्ञा यांना कोर्टात हजर राहण्याबाबत सूट दिली आहे.

मालेगाव प्रकरण काय आहे?

महाराष्ट्रातील मालेगावात २९ सप्टेंबर २००८ रोजी उत्तर असलेल्या एका मशिदीबाहेर एका मोटरसायकलचा स्फोट झाला. या मोटरसायकलमध्ये स्फोटके लावण्यात आली होती. ज्यामुळे हा स्फोट झाला. या स्फोटात ६ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. ज्या मोटरसायकलचा स्फोट झाला ती गाडी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावे नोंदवली होती, असे पोलिसांनी म्हटले आहे. साध्वी प्रज्ञा यांना याप्रकरणी अटक करण्यात आली. २०१७ मध्ये मात्र साध्वी प्रज्ञा यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता मालेगाव स्फोटाचे प्रकरण मुंबईच्या एनआयए कोर्टात आहे.

First Published on: June 21, 2019 2:13 PM
Exit mobile version