‘खोटं ही बरोबर बोलू शकत नाहीत’, प्रकाश राज यांनी उडवली शाहांची खिल्ली

‘खोटं ही बरोबर बोलू शकत नाहीत’, प्रकाश राज यांनी उडवली शाहांची खिल्ली

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली केली. बिहारमधील व्हर्च्युअल रॅलीतील अमित शाहांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या काळात ५१ कोटी लोकांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये पाठवले, असं अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले. मात्र, हे बोलताना त्यांचा गोंधळ उडाला आणि त्यांना निश्चित असा आकडा देखील त्यांना सांगता आला नाही. या भाषणाचा व्हिडीओ बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करत अमित शाहांवर निशाणा साधला आहे.

अभिनेते प्रकाश राज आपल्या ट्विटर हँडडलवरुन अमित शाहांचा व्हिडीओ शेअर करत अमित शाहांवर निशाणा साधला आहे. “काय लाजिरवाणी बाब आहे. खोटं ही बरोबर बोलू शकत नाहीत,” असं ट्विटमध्ये लिहिलं आहे. प्रकाश राज यांचं ट्विट चांगलच व्हायरल झालं आहे.

गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या भाषणात व्हर्च्युअल रॅलीचा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराशी काहीही संबंध नाही, असं स्पष्ट केलं. मला कोविड-१९ विरुद्ध लढा द्यायचा असून या लढाईत मला लोकांसोबत जोडलं जायचं आहे, असं अमित शाह म्हणाले. या व्हर्च्युअल रॅलीत अमित शाहांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.

 

First Published on: June 12, 2020 11:40 AM
Exit mobile version