निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांना धक्का; प्रशांत किशोर यांनी दिला सल्लागारपदाचा राजीनामा

निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांना धक्का; प्रशांत किशोर यांनी दिला सल्लागारपदाचा राजीनामा

अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिल्याने अमरिंदर सिंग यांना मोठा धक्का मानला जात आहे. प्रशांत किशोर यांनी राजीनामा देताना खासगी कारण पुढे केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी याच वर्षी २ मार्चला मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशांत किशोर यांनी राजीनामा देताना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये “मला सार्वजनिक जीवनातील सक्रिय भूमिकेपासून तात्पुरता विश्रांती हवी आहे. त्यामुळे मी तुमचा प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदाऱ्या हाताळू शकत नाही. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया मला या जबाबदारीतून मुक्त करा. पुढे काय करायचं हे मी अजून ठरवलेलं नाही. या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद,” असं प्रशांत किशोर यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची कमान घेतली गेली

प्रशांत किशोर यांनी २०१७ मध्ये पंजाब विधानसभेदरम्यान काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा कार्यभार स्वीकारला होता. पीकेच्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीने (I-PAC) कंपनीने पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसला मदत केली. प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या प्रचाराची जबाबदारीही घेतली होती.

 

First Published on: August 5, 2021 5:07 PM
Exit mobile version