स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा – अमित शहा

स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा – अमित शहा

शिवसेनेशी युती करायची की नाही याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पण, तुम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करा असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अमित शहा सध्या गोवा आणि महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा असे आदेश दिले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप राज्यातील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेना आण आणि भाजपमध्ये सध्या दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये युती होईल की नाही? याबद्दल तरी शंकाच आहे. नाराज असलेल्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. पण, शिवसेना अद्यापही सत्तेत आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुका शिवसेना – भाजपने एकत्र लढल्या होत्या. पण विधानसभा निवडणुकीवेळी मात्र भाजपने स्वबळाची घोषणा केली होती. त्यानंतर देखील शिवसेनेचे ६६ आमदार विजयी झाले होते.

‘सामना’तून भाजपवर टीकेचे बाण

सत्तेत असून देखील सन्मान मिळत नाही. शिवाय महत्त्वाच्या निर्णयांपासून लांब ठेवले जात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. त्यामुळे नाराज शिवसेनेने वेळोवेळी सामनातून भाजप, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर टीकेचे बाण सोडत आहे. सामनातून होणाऱ्या टीकेवरून भाजपमध्ये देखील प्रचंड नाराजी आहे. मध्यंतरीच्या काळात आक्रमक झालेल्या शिवेसेना मंत्र्यांनी तर राजीनामे खिशात असल्याची भाषा केली होती. त्यामुळे भाजप सरकार पडणार या शिक्कामोर्तब झाले होते. मात्र अद्याप देखील शिवसेना सत्तेत आहे. वेळोवेळी शिवसेनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी वजा इशारा दिला गेला. विविध मुद्यांवर आक्रमक झालेल्या शिवेसेने भाजपवर टीका केल्याने सेनेची नाराजी दूर करण्यााठी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पण, त्यानंतर देखील शिवसेनेची नाराजी कायम आहे.

अमित शहांची ‘मातोश्री’ वारी

नाराज शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवारी केली. यावेळी तब्बल बंद दाराआड अडीच तास चर्चा झाली. पण त्यानंतर देखील शिवसेनेची नाराजी कायम आहे. शिवाय सामनातून देखील होणारी टीका कायम आहे. पावसाळी अधिवेशानामध्ये देखील विश्वासदर्शक ठरावा दरम्यान शिवसेनेने गैरहजर राहणे पसंत केले. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय ? याबद्दल अद्याप तरी संभ्रम कायम आहे.

 

वाचा – सेना-भाजप युती टिकवण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर?

वाचा – भाजपाची शिष्टाई फेल, आदित्य ठाकरेंचा स्वबळाचा नारा!

First Published on: July 23, 2018 9:15 AM
Exit mobile version