लोकशाहीत सत्ताधारी-विरोधक दोघांचीही भूमिका महत्त्वाची

लोकशाहीत सत्ताधारी-विरोधक दोघांचीही भूमिका महत्त्वाची

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देशाच्या विकासासाठी मिळून मिसळून काम करण्याची गरज आहे.लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोन्हींची भूमिका महत्त्वाच्या आहे. राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबर देशाच्या कल्याणासाठी एकजुटीने पुढे जायला हवे, असे राष्ट्रपती रामनाद कोविंद यांनी म्हटले आहे.लोकशाही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबरच देशाचा समग्र विकास आणि देशवासियांच्या कल्याणासाठी दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे, असेही राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.

कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणार्‍या लोकांनी आणि विशेषत: तरुणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचे कायम स्मरण ठेवावे. गांधीजींची अहिंसा ही मानवतेसाठीची अमूल्य देणगी आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात कोविंद यांनी तरुणांना हे आवाहन केले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोविंद यांचं हे आवाहन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणार्‍यांनी विशेष करून तरुणांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचे कायम स्मरण ठेवावे, असे आवाहन रामनाथ कोविंद यांनी केले.

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मिशन गगनयान मधे इस्रो प्रगती करत आहे, या वर्षात, भारतीय मानव अंतराळ यान कार्यक्रम अधिक वेगानं पुढे जाण्याची, सर्व देशवासीय मोठ्या उत्सुकतेनं प्रतिक्षा करत आहेत. यावर्षी टोकियोमध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. भारतानं अनेक क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी बजावण्याची परंपरा कायम राखली आहे. आपले खेळाडू आणि अ‍ॅथलिट्स यांनी गेल्या काही वर्षात, अधिकाधिक क्रीडा प्रकारात, देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक 2020 मधे, भारतीय पथकांच्या पाठीशी कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा राहणार आहेत.

प्रवासी भारतीयांनी देशाचा गौरव नेहमीच वाढवला आहे. परदेशस्थ भारतीयांनी तिथली भूमी समृध्द करण्याबरोबरच, जागतिक समुदायासमोर भारताची प्रतिमा उंचावली आहे असं माझ्या परदेश दौर्‍यात मी अनुभवलं आहे. यातल्या अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे. राष्ट्र निर्मितीत, महात्मा गांधीजींचे विचार आजही संयुक्तिक आहेत. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या संदेशावर चिंतन आणि मनन करणं हा आपल्या दिनचर्येचा एक भाग राहायला हवा. सत्य आणि अहिंसेचा त्यांचा संदेश, आजच्या काळात अधिकच आवश्यक झाला आहे. प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानाचा उत्सव आहे. आजच्या दिवशी, संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपल्यापुढे मांडू इच्छितो, त्यांनी म्हटलं होते ‘आपल्याला केवळ वरवर नव्हे तर वास्तवातही लोकशाही कायम राखायची असेल तर आपल्याला काय करायला हवं ? माझ्या मतानुसार, आपलं पहिलं काम म्हणजे, हे सुनिश्चित करणं आहे की, आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यासाठी संविधानातल्या तरतुदींचा अत्यंत निष्ठापूर्वक आधार घेतला पाहिजे’. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या शब्दांनी, आपला मार्ग सदैव प्रकाशमान केला आहे. त्यांचे हे शब्द, आपल्या राष्ट्राला, गौरवाच्या शिखरावर नेण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत राहतील असा मला विश्वास आहे. असेही ते यावेळी म्हणाले. विकासाच्या मार्गावरून पुढे वाटचाल करताना, आपल्या आणि संपूर्ण मानवतेच्या सुरक्षित आणि समृध्द भविष्याकरिता, जागतिक समुदायाशी सहकार्य करण्यासाठी, आपला देश आणि आपण सर्व देशवासीय, वचनबद्ध आहोत.

First Published on: January 26, 2020 2:58 AM
Exit mobile version