Budget 2020: पाच वर्षात अनेक क्षेत्रात भारताची मान उंचावली – रामनाथ कोविंद

Budget 2020: पाच वर्षात अनेक क्षेत्रात भारताची मान उंचावली – रामनाथ कोविंद

पाच वर्षात अनेक क्षेत्रात भारताची मान उंचावली - रामनाथ कोविंद

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमन वर्ष २०१९-२०चं आर्थिक सर्वेक्षण दुपारी १ वाजता सादर करणार आहे. याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं. यावेळी त्यांनी सदस्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत अभिभाषणाला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी भारतासाठी येणार दशक महत्त्वपूर्ण असून नव्या ऊर्जेने नव्या भारताला गती द्यायची आहे, असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. तसंच यावेळी रामनाथ कोविंद यांनी अनेक क्षेत्रात भारताची मान उंचावली असून देशाचे पाच वर्षात रँकिंग सुधारले असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय त्यांनी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे देखील कौतुक केलं. तिहेरी तलाक, जम्मू काश्मीर मधील ३७० हद्दपार करणे, राम मंदीर अशाप्रकारच्या ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसंच त्यांनी लडाखमधील नागरिकांचे अभिनंदन केलं. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना अधिकार मिळाले असल्याचं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

पुढे त्यांनी सांगितलं की, गेल्या पाच वर्षात भारताचा मजबूत पाया सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे रचण्यात आला आहे. माझ्या सरकारचं स्पष्ट मत आहे की, चर्चा वादविवाद लोकशाहीला बळकट करतात. तर दुसरीकडे समाजाला आणि देशाला कोणत्याही प्रकारची हिंसा दुबळं बनवण्याचं काम करते. माझं सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ मंत्राचा अवलंब करत प्रामाणिकपणाने काम करत आहे.

तसंच यावेळी रामनाथ कोविंद यांनी सरकारच्या योजनेअंतर्गतबाबत केलेल्या कामाबद्दल सरकारची पाठ थोपटली. मार्च २०१८ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे ३५०० घरे बांधली. मात्र दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत २४ हजार पेक्षा जास्त घरे पूर्ण झाली आहेत. तसंच याशिवाय ८ कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन दिलं असून २४ कोटी लोकांना विमा सुरक्षा दिली असल्याचं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.


हेही वाचा – करोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित


 

First Published on: January 31, 2020 12:15 PM
Exit mobile version