प्रियंका गांधींनी जिथे प्रचार केला तिथे काँग्रेसला अपयश

प्रियंका गांधींनी जिथे प्रचार केला तिथे काँग्रेसला अपयश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीन प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस कडून त्यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस पदाची सुत्रे देण्यात आली. प्रियंका गांधी यांच्या राजकारणात येण्याने भाजपला धस्का भरला होता. त्यामुळे भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती. काही नेत्यांनी तर आक्षेपार्य शब्दात प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे काँग्रेसला प्रियंका गांधी यांच्याकडे भरपूर अपेक्षा होती. मात्र आपला भाऊ राहुल गांधी यांना विजय मिळवून देण्यात प्रियंका गांधी अपयशी ठरल्या.

प्रचारसभा घेतलेल्या ठिकाणी अपयश

प्रियंका गांधी यांनी ज्या मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेतल्या त्या प्रचारसभांमध्ये प्रियंका गांधी यांना अपयश आले. फक्त सोनिया गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ आणि राहुल गांधी यांचा वायनाड मतदारसंघात प्रियंका गांधींना काँग्रेसला यश मिळवून देण्यात अपयश आले. याशिवाय पंजाबमध्ये काँग्रेसने १३ पैकी ८ जागा जिंकल्या. मात्र, पंजाबच्या ज्या मतदारसंघांमध्ये प्रियंका गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या त्या दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसला अपयश आले.

First Published on: May 24, 2019 2:13 PM
Exit mobile version