विरोधी पक्षाला देशापेक्षा आपले राजकीय हित महत्त्वाचे, काँग्रेसच्या आंदोलनावर पंतप्रधानांनी ओढले ताशेरे

विरोधी पक्षाला देशापेक्षा आपले राजकीय हित महत्त्वाचे, काँग्रेसच्या आंदोलनावर पंतप्रधानांनी ओढले ताशेरे

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मात्र, दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प आहे. महागाई विरोधात विरोधकांकडून चर्चा करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर ताशेरे ओढले आहेत. विरोधी पक्षाला देशापेक्षा आपले राजकीय हित महत्त्वाचे आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचे माजी राज्यसभा खासदार हरमोहन सिंग यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज काँग्रेसच्या चारही खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. महागाई विरोधात सभागृहात फलक घेऊन निर्देशनं केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मोदींनी सभागृहात यावं आणि महागाई, खाद्यपदार्थांवर अलीकडेच वाढवलेल्या जीएसटीबाबत आपलं मत व्यक्त करावं, अशी मागणी काँग्रेसच्या खासदारांकडून करण्यात आली आहे.

मोदी सरकारने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षाला सध्या देशापेक्षा स्वत:चे राजकीय हित महत्त्वाचं आहे. देशाच्या विकासकामात विरोधकांमुळे अडथळा निर्माण होत आहे. हेच विरोधक सत्तेत असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू शकले नाही, असं पीएम मोदी म्हणाले.

हरमोहन सिंग यादव दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांनी विधान परिषद सदस्य, आमदार, राज्यसभा सदस्य आणि अखिल भारतीय यादव महासभेचे अध्यक्ष म्हणून विविध पदांवर काम केले आहे. हरमोहन सिंग यादव यांचे चौधरी चरण सिंग आणि राम मनोहर लोहिया यांच्याशी जवळचे संबंध होते. हरमोहन सिंग यादव यांच्यासह त्यांचे पुत्र आणि विधान परिषदेचे माजी अध्यक्ष सुखराम सिंह यांनीही कानपूर आणि आसपासच्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.


हेही वाचा : क्‍वालिटीचे काम झाले नाही, तर डोके फोडेन..,यशोमती ठाकूर यांचा व्हिडीओ व्हायरल


 

First Published on: July 25, 2022 10:56 PM
Exit mobile version