राज्यसभेत सत्ताधारी खासदार गैरहजर, पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त करत मागितली यादी

राज्यसभेत सत्ताधारी खासदार गैरहजर, पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त करत मागितली यादी

राज्यसभेत सत्ताधारी खासदार गैरहजर, पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त करत मागितली यादी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. अधिवेशनाची सुरुवातच वादळी झाली असून कृषी कायदा, आरक्षण, कोरोना आणि पेगॅसस प्रकरणावरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. विरोधकांच्या आक्रमकपणामुळे अनेकवेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. शेवटच्या टप्प्यात अधिवेशन आलं असून महत्त्वाची विधेयकं पास करण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये संसदेत सत्ताधारी खासदार गैरहजर राहिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गैरहजर असलेल्या खासदारांच्या नावांची यादी पंतप्रधान मोदी यांनी मागितली आहे.

सभागृहात न्यायाधिकरण सुधारणा विधेयक २०२१ मांडण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गैरहजर भाजप खासदारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हे विधेयक गोंधळात पास झाले. विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे आवाजी मताने विधेयक पास करण्यात आले. न्यायाधिकरण सुधारणा विधेयकात चित्रपट कायदा, सीमाशुल्क कायदा, ट्रेड मार्क्स असे अनेक सुधारणा विधेयकामध्ये केल्या आहेत. हे विधेयक विरोधकांनी निवड समितीकडे पाठवण्यात यावा असा प्रस्ताव केला. मात्र प्रस्तावाच्या बाजूने ४४ तर विरोधात ७९ मते पडली यामुळे विरोधकांची मागणी रद्द करत आवाजी मतदानाने विधेयक पारित करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे विधेयक पारित करताना भाजप खासदार गैरहजर होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली.

विरोधकांचा संसदेत गोंधळ

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधकांनी केंद्र सरकारला कृषी कायदा, आरक्षण, कोरोना आणि पेगॅसस प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकार विरोधकांची मागणी फेटाळत असल्यामुळे विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृह अधिक वेळ स्थगितच करण्यात येत आहे. यामुळे पावसाळी अधिवेशनात अधिक विषयांवर चर्चा होत नाही आहे. मात्र केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विरोधकांना केवळ पेगॅसस, कोरोना आणि शेतकरी आंदोलन या विषयांवर चर्चा हवी असल्यामुळे सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी करण्यात येत आहे.

First Published on: August 10, 2021 8:28 PM
Exit mobile version