पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; हे नेते सहभागी होणार

पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; हे नेते सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

सोमवारी भारत आणि चीन सैनिकांमधील गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात देशाचे २० सैनिक शहीद झाले. या तणावानंतर देशात संतापाचं वातावरण असून चीनवर पलटवार करण्याची मागणी आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीन वादावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभाग घएणार आहेत.

या बैठकीत सध्या चालू असलेला चीनबाबतचा वाद आणि सद्यस्थिती यावर चर्चा होईल. संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार असून व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाग घेणार आहेत. परंतु काही राजकीय पक्षांना आमंत्रित केलेलं नाही, त्यामुळे वाद सुरू आहे.


हेही वाचा – भारत-चीन चकमकीनंतर भारताचे ७६ सैनिक रुग्णालयात दाखल


या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला एकूण १६ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. काँग्रेसच्या सोनिया गांधी, डीएमकेचे एमके स्टालिन, तेलुगू देशम पक्षाचे एन. चंद्रबाबू नायडू, वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे वाय.एस. जगनमोहन रेड्डी, राष्ट्रवादीचे शरद पवार, जनता दलाचे नितीश कुमार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, सीताराम येचुरी, बिजु जनता दलाचे नवीन पटनायक, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे के. चंद्रशेखर राव, तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर बादल, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, झारखंड मुक्ति मोर्चा पक्षाचे हेमंत सोरेन या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

अनेक राजकीय पक्षांना न बोलवण्यावरून वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी वाद सुरू झाला आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने असा आरोप केला जात आहे की त्यांच्याकडे चार खासदार असून राज्यसभेचे प्रतिनिधीही आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाला आमंत्रित केलेलं नाही, अशा परिस्थितीत तेजस्वी यादव यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

First Published on: June 19, 2020 8:34 AM
Exit mobile version