अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती अत्यवस्थ

अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती अत्यवस्थ

फोटो सौजन्य - ANI

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून अटलबिहारी वाजपेयी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, एम्सचे अनुभवी डॉक्टर अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. ११ जूनपासून वाजपेयींवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. किडनीच्या आजारांनी त्रस्त असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. १५ वर्षापासून अटलबिहारी वाजपेयींनी राजकारणापासून संन्यास घेतला आहे.

First Published on: August 15, 2018 7:42 PM
Exit mobile version